Sanjay Raut Jail News : अब्रुनुकसानाच्या खटल्यात संजय राऊत दोषी, राऊतांना 15 दिवसांची कैद

Continues below advertisement

Sanjay Raut Jail News : अब्रुनुकसानाच्या खटल्यात संजय राऊत दोषी, राऊतांना 15 दिवसांची कैद

मुंबई : महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे खणून काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी  संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आला आहे.  25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने  निकाल दिला आहे.  2022 सालचे हे प्रकरण आहे.  मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यांवर आरोप केला होता.  

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मीरा भाईंदर येथील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 15 दिवसाची कैद असल्याने संजय राऊत जामीनास पात्र आहे.  त्यानंतर  आता संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल. ते स्वत:ला सरेंडर करतील.  त्यानंतर कोर्ट त्यांना जामीन मंजूर करण्याची शक्यता आहे. सुनावणीवेळी संजय राऊत कोर्टात उपस्थित नव्हते. परंतु  कोर्टाने आपल्या नियोजीत वेळेत निकालाचे वाचन  पूर्ण केले आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram