Sanjay Raut On MVA Seat Allocation : 85-85-85 मविआचा फॉर्मुला, आमचं जागावाटप सुरळीत : संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut On MVA Seat Allocation : 85-85-85 मविआचा फॉर्मुला, आमचं जागावाटप सुरळीत : संजय राऊत
२७० जागांवर महाविकास आघाडीचा तिढा सुटला.. तुर्तास तिन्ही पक्षांसाठी ८५-८५-८५चा फॉर्म्युला ठरला... त्या १५ जागांवर निर्णय नंतर...
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद खासदार संजय राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, अनिल देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात प्रश्न विचारले जायचे असं म्हटलं. मविआची बैठक शरद पवार यांच्या सोबत पार पडली. शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर करण्याचे आदेश दिले. मविआचं जागावाटप सुरळीतपणे पार पडलं आहे, असं राऊत यांनी सांगितलं.  समाजवादी पार्टी, शेकाप यांंना सामावून घेणारं जागावाटप असेल. 85-85-85 असं एकूण 270 जागांवर यादी बनवलेली आहे. उरलेल्या जागांवर मित्रपक्षांसोबत चर्चा सुरु होईल. या प्रकारे 288 जागा मविआ पूर्ण ताकदीनं लढेल,असं संजय राऊत म्हणाले.  

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram