Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', Sanjay Raut दोन महिने राजकारणातून बाहेर; PM Modi म्हणाले 'लवकर बरे व्हा'.

Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने दोन महिने सार्वजनिक जीवनातून दूर राहणार असल्याची घोषणा केली आहे. 'सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचं समजालंय,' असे राऊत यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना गर्दीत मिसळण्यास आणि बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली असून, नवीन वर्षात पुन्हा सर्वांना भेटेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर पोस्ट करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊत यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola