Mumbai Hostage Crisis: रोहित आर्य एकटा नव्हता? ओलीसनाट्यात आणखी कोण सामील? Special Report

Continues below advertisement
मुंबईच्या पवई येथील RA स्टुडिओमध्ये रोहित आर्यने (Rohit Arya) १७ मुलांना ओलीस ठेवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोहितचा मृत्यू झाला, पण आता या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'तुम्ही पाहिजे पायात गोळी का न मारली? त्याला न्यूट्रॉल का नाही केलं?' असा सवाल करत ॲडव्होकेट नितीन चाचपुते (Nitin Chachapute) यांनी हे एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप करून कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी मंगला पाटणकर यांनी रोहित एकटा नसून, त्याची संपूर्ण टीम, ज्यात प्रियंका नावाची एक मुलगी होती, ती सुद्धा सामील असल्याचा दावा केला आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांनी मात्र पोलिसांची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चित्रपट निर्माता असल्याचे भासवणाऱ्या रोहितने अभिनेत्री रुचिता जाधव (Ruchita Jadhav), गिरीश ओक (Girish Oak) आणि उर्मिला कानेटकर-कोठारे (Urmila Kanetkar Kothare) यांच्याशी संपर्क साधल्याचेही समोर आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola