Sanjay Raut Full PC : मोदी-शाहांनी अहंकाराच्या मर्यादा तोडल्या, RSS काय करणार? राऊतांचा थेट सवाल
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ घेतल्यामुळे राज्यात भाजपचे (BJP) नुकसान झाले असल्याचे खडेबोल संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गेनायजरमधून सुनावण्यात आले आहे. आरएसएसचे (RSS) सदस्य रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी मर्यादा पाळल्या नाहीत, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भाजपवर निशाणा साधला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि आरएसएसला डिवचले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आरएसएसचे मुख्यपत्र अनेक आहेत. त्यांनी हे पण सांगितलं की सेना-भाजप युती तुटायला नव्हती पाहिजे. भाजपची मातृसंस्था आरएसएस होती. पण आता शीर्ष नेतृत्व भाजपचे काय म्हणताय सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रमध्ये सत्ता मिळवली हे लोकांना आवडले नाही. अशोक चव्हाण, अजित पवार यांना जेलमध्ये मोदी टाकणार होते ना? मग त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आणि घेतलं.