Sanjay Raut Full PC : लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होत नाही : संजय राऊत

Continues below advertisement

संजय राऊत

ऑन दोन शिवसेना वर्धापन दिन

हा एक हास्यास्पद प्रकार आहे, मी त्यांचे काही ठिकाणी पोस्टर्स पाहिले

उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षांपूर्वी शिवसेनेचा पाया घातला

58 वर्षांपासून बाळासाहेबांची शिवसेना मुंबई,महाराष्ट्र,दिल्लीत काम करतेय, आम्ही तेव्हापासून त्यांच्या विचारांनी भारावलेले सर्व तरुण, तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारांनी भारावून आम्ही भगवा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला

आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो, आमच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी या पक्षासाठी बलिदान दिलं, आम्ही सर्वांनी तुरुंगवास भोगला पण आम्ही आमच्या पक्षाशी इमान कायम ठेवला

आता जर कोणी म्हणत असेल ते शिंदे गट आमची शिवसेना खरी तर त्यांनी स्वतःला आरशात पहावं

बाळासाहेबांचे शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते, कुठल्या गोधडीत रांगत होते, डोम नावाच्या सभागृहात कुठेतरी हे दोन कावळे जमणार आहेत उद्या

पैशाने मत विकत घेणं वाईकरांच्या विजयाची चोरी करण याला जनाधार म्हणत नाहीत, आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांशी चरणाशी ठेवणं याला जनाधार आणि विचारधारा म्हणत नाही

लांडग्यान वाघाचं कातड पांगरलं तर तो वाघ होत नाही, हिंदुरुदय सम्राटांची शिवसेना उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचा नेतृत्व करत आहेत

जिथे ठाकरे तिथे शिवसेना, हे मधून शिंदे मिंदे उपटले कुठून, हे जे उपटे आहेत यांना भाजपने आणलं, हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांची ही कारस्थान आहेत

शिवसेना अशा प्रकारे फोडण हे महाराष्ट्रावरचं सर्वात मोठा आक्रमण आहे, मोघलांनंतर सर्वात मोठं आक्रमण मोदी शहा यांनी केलं

राज्यात पैशाच्या ताकदीवर पाच सहा जागा जिंकल्या म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांचे होत नाही

आम्ही कोणाविषयी नकली शब्द करत नाही, असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तोच सर्वात मोठा पक्ष आहे

शिंदेंचा जे काही प्रकरण आहे ते काही दिवसांतच बंद होईल

ऑन नाना पटोले पाय धुणं

चांगली गोष्ट आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल की त्यांचे पाय धुवावे मग धुवू द्या की, त्यात काही हरकत नाही आमचा काय संबंध

ऑन नाना पटोले वक्तव्य शोषित शिवसेना


लहान आहेत ते

ऑन सेबी कार्यालय आंदोलन

तृणमूल काँग्रेस कडून त्यांचा एक डेलिगेशन घेऊन तिथे आंदोलन करणार आहेत, त्यात शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि इतर खासदार सहभागी होतील, राष्ट्रवादीलाही आमंत्रण आहे, त्यानंतर सर्व खासदार मातोश्रीवर उद्धव साहेबांना भेटायला येतील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram