Sanjay Raut Full PC : मालक तुम्ही उद्धव ठाकरे यांना फोन का केला - संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : मालक तुम्ही उद्धव ठाकरे यांना फोन का केला  - संजय राऊत

'सत्ता टिकवण्यासाठी ही लाचारी आहे . ED, CBI पासून वाचण्यासाठी हे सगळे तिथे गेलेत .शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे . आमचा कारभार स्वतंत्र होता .प्रखर राष्ट्रवादी हेच आमचे हिंदुत्व .तुम्ही स्वतंत्र राहिले नाहीत .तुमच्यावर कोणाचातरी नियंत्रण आहे हे तुम्ही घ्यायला गेलेल्या बौद्धिकतेवरून दिसून येतं . Rss अनेक संस्था निर्माण केल्या .आम्हाला एवढी भीक लागली नाही की आम्ही दुसऱ्याकडून बौद्धिक घ्यावी .असं म्हणत संघ आणि संघ परिवार यांच्याशी माझे नाते लहानपणापासूनच असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्यानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे .गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्यावरही त्यांनी हल्लाबोल केलाय .मालक तुम्ही उद्धव ठाकरे यांना फोन का केला असा सवाल शिंदे यांनी फडणवीस यांना विचारावा असाही खोचक टोला राऊतांनी लगावला .

संघ आणि संघ परिवार यांच्याशी माझे नाते लहानपणापासूनचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे .संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली .त्यानंतर शिवसेनेच्या शाखेत मी दाखल झालो आणि बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा विचारांची जोडलो गेलो .या वक्तव्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना  टोला लगावलाय .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram