Sanjay Raut Full PC : गेल्या तीन वर्षात दिल्लीपुढे झुकणारा महाराष्ट्र तयार झाला

Sanjay Raut Full PC : गेल्या तीन वर्षात दिल्लीपुढे झुकणारा महाराष्ट्र तयार झाला
जातनिहाय जनगणना करण्याचा विषय त्यांनी देश युद्धाच्या सावट खाली असताना हा निर्णय घेतला, राहुल गांधी यांनी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले, श्रेय ज्यांना द्यायचे आहे त्यांना द्यावे लागेल,  जातनिहाय जनगणनेचा विषय राहुल गांधी उचलला, जनतेला त्यांनी सांगितले,  पहलगाम विषयी प्रश्न विचारले जातील म्हणून आता हा निर्णय घेतला, बिहार निवडणुका आहेत म्हणून हा निर्णय आता घेतला, ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना समजणार नाही, त्यांची विचारधारा वेगळी आहे, ही बहुजन समाजाची गोष्ट आहे, कुठे आहे महाराष्ट्र, हा दिल्लीपुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात,  हिमायल उरला आहे का? आणि सह्याद्री कोण ?  ही सीएम म्हणजे टेकाड आहेत, आणि बाकी दोघे महाराष्ट्राला आलेले तेंगुळ आहेत, कुठे यशवंतराव चव्हाण, कुठे वसंतदादा पाटील, आणि कुठे हे लोक? हे तेंगुळ आहेत फक्त, ट्रम्प ने पण जाहीर केले आहेत, शंभर दिवस प्रोग्राम,  106 हुतात्म्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र कुठे आहे आता, पहलगाम मध्ये हल्ला झाला, निदान एक आठवडा तरी दुखावता पळायला पाहिजे होता प्रधानमंत्री यांनी, दुसऱ्या दिवशी प्रचाराला गेले ते, आज इथे येऊन भाषण देणार आहेत, ही यांची राष्ट्रभक्ती आहे,   अजूनही काही पूजा आहेत बाकी, ती मुलगी हुशार आहे, तिने सागर बंगल्यावर अभ्यास केला म्हणून तिला 92 टक्के मिळालेझ आता ती वर्षावर अभ्यास करेल,  मी त्यांना शुभेच्छा देतो, मला अशा आहे की गुवाहाटी वरून आणलेली जमिनीत पुरली गेलेली शिंग आहेत, ती त्यांनी काढली असतील अशी माझी आशा आहे, मी देखील संसदीय कामासाठी तिकडे गेलो होतो, अमावस्येला दिवसभर तिकडे होतो, मी देखील अभ्यास केला, गुवाहाटी ते वर्षा बंगला, त्या शिंगांचे प्रवास कसा झाला ते मला माहित आहे,  शरद पवार यांच्या तोंडांत साखर पडो, पण त्यांनी देखील एक वेळ प्रयत्न केला होता राज ठाकरे यांच्याशी युती करायचा, पण उद्धव ठाकरे यावेळी अत्यंत अनुकूल आहेत,

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola