Bhendwal Ghatmandni : पाकिस्तान युद्धाबाबत भेंडवळच्या भविष्यवाणीत मोठं भाष्य
Bhendwal Ghatmandni : पाकिस्तान युद्धाबाबत भेंडवळच्या भविष्यवाणीत मोठं भाष्य
बुलढाणा जिल्ह्याच्या (Buldhana District) जळगाव जामोद तालुक्यातील (Jalgaon Jamod Taluka) पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावात 370 वर्षापासून प्राचीन अशी घटमांडणीची (Bhendwal Ghat Mandani) परंपरा जोपासली जाते. या ऐतिहासिक आणि मोठं संस्कृतिक महत्वअसलेल्या ही परंपरा शेतकऱ्यांसाठी बहु प्रतिक्षित पीक परिस्थिती, पाऊसपाणी त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी असून, संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. " भेंडवळची घटमांडणी " दरम्यान, आज (30 एप्रिल) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे.
युद्ध होणार की नाही?'भेंडवळ'च्या भाकितांकडे साऱ्यांचे लक्ष
यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील..? याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीतलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज घेणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांच , राजकीय नेत्यांच लक्ष लागलेल असतं. अशातच नुकताच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) देशभरात संतापाची लाट पसरली आहे.