Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे गेल्या एक महिन्यापासून सार्वजनिक जीवनापसून दूर असल्याचे पाहायला मिळाले होते. एका गंभीर आजारावर संजय राऊत हे सध्या उपचार घेत आहेत. मात्र, आज महिन्याभरानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शिंदे गँगच्या गुलाबरावांनी सांगितलंय की, लक्ष्मी दर्शन होणार. निवडणूक आयोगाने माहिती घ्यायला हवी, असे म्हणत त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर निशाणा साधला. तर शिंदे गटाचा कोथळा अमित शाह (Amit Shah) काढणार, असे देखील संजय राऊत म्हणाले. तर राज ठाकरे (Raj Thackeray) सोबत आल्याने भारतीय जनता पक्षाचा (BJP) पराभव होणार असल्याचे भाष्य देखील संजय राऊत यांनी केले.
संजय राऊत म्हणाले की, माझी तब्ब्येत सुधारते आहे. उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे. आता ही त्यांची परवानगी नाही. मात्र, तुम्ही सर्व आलात थोडं तब्बेतीत सुधारणा होतेय, अजूनही होईल. आजारापेक्षा उपचार कठोर असतात. मला खात्री आहे की, डिसेंबरनंतर मी पूर्ण बरं होईल. रिकव्हरी सुरु आहे. नगरपालिका निवडणुका उद्या आहेत. शिंदे गँगच्या गुलाबरावांनी सांगितलंय की, लक्ष्मी दर्शन होणार. निवडणूक आयोगाने माहिती घ्यायला हवी, असे त्यांनी म्हटले.
Sanjay Raut on Eknath Shinde: शिंदेंच्या गटाचा कोथळा अमित शाह काढणार
सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत पैशाचा इतका खेळ झाला नव्हता. या निवडणुका राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार निवडणूक लढवत नव्हते. स्थानिक पातळीवरच लोक लढत होते. आता 5, 6 हेलिकॉप्टर, खाजगी विमान वापरत आहेत. नगरपालिकेसाठी सत्तेतल्या 3 पक्षातील स्पर्धा आहे. इतके कोट्यावधी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय? आपापसात मारामाऱ्या सोडा. तीन पक्षातील ही स्पर्धा आहे. शिंदे यांची शिवसेना म्हणायला आम्ही तयार नाही. त्यांचा कोथळा अमित शाह काढणार हे लिहून घ्या. त्यांनी आमचा काढायचा प्रयत्न केला होता. शिंदेंचे 35 आमदार फुटणार. रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची नेमणूक त्यासाठीच केली आहे.