Devendra Fadnavis : Sanjay Raut यांना नोटीस आल्यावर ते का घाबरतात? ABP Majha

Continues below advertisement

Devendra Fadnavis : गोपनीय कायद्याचा भंग केला आहे आणि मीच आरोपी आहे, असे प्रश्न मला विचारण्यात आले असल्याचे दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबई पोलिसांनी दोन तास चौकशी केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला. यापुढेही राज्य सरकारचे काळे कारनामे बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी म्हटले. सभागृहात उपस्थित करत असलेल्या प्रश्नामुळे ही चौकशी दबावासाठी करण्यात आली असल्याचाही आरोप त्यांनी केला. 

राज्यातील बदल्यांच्या महाघोटाळ्याची माहिती केंद्रीय गृह सचिवांना दिली. या महाघोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. याआधी महाघोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारने दाबून ठेवला होता. राज्य सरकारने कोणतीच कारवाई केली नव्हती असेही फडणवीस यांनी म्हटले. वेळेत राज्य सरकारने याची चौकशी केली असती तर हे करावं लागलं नसतं असेही फडणवीस यांनी म्हटले.
 याआधी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती. मात्र, ती प्रश्नावली आणि आज विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये मोठा फरक होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. या प्रकरणात मला आरोपी अथवा सह आरोपी करता येईल का असा पोलिसांच्या प्रश्नाचा रोख होता. मी गोपनीय कायद्याचा भंग केला असा रोख पोलिसांचा होता. माझ्या आरोपानंतर कोर्टाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. माझ्यावर व्हिसलबोअर कायदा लागू झाला पाहिजे असे फडणवीस यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram