Sanjay Raut PC Voter List Scam: 'निवडणूक आयोग ही BJP ची शाखा', राऊतांचा थेट आरोप
Continues below advertisement
शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादीतील घोटाळ्यावरून (Voter List Scam) भाजपवर (BJP) आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार हल्ला चढवला आहे. 'निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची शाखा म्हणून काम करते', असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला. कर्नाटकमध्ये (Karnataka) प्रति मत डिलीट करण्यासाठी ८० रुपये दिले जात होते, आणि तोच फॉर्म्युला आता महाराष्ट्रात वापरला जात असल्याचा दावा त्यांनी केला. भाजप आणि शिंदे गटाने राज्यात सहा ते सात एजन्सी कोट्यवधी रुपये देऊन मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्यासाठी लावल्या आहेत, असेही ते म्हणाले. या घोटाळ्याच्या विरोधात १ नोव्हेंबरला सर्वपक्षीय विराट मोर्चा काढणार असून, त्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी कार्यकर्त्यांचे फोन सर्वेलन्सवर असल्याचे वक्तव्य केल्याचा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement