Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग समितीच्या नोटीसला उत्तर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग समितीच्या नोटीसला उत्तर दिलंय. मी मुंबईच्या बाहेर असताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हणत संजय राऊतांनी वक्तव्य विशिष्ट गटासाठी होतं, आणि विधिमंडळाचा अपमान करण्याचा आपला हेतू नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलंय. त्याचसोबत आपलं वक्तव्य पुन्हा एकदा तपासून पाहावं असं आवाहनही संजय राऊतांनी केलंय.