Sanjay Kelkar VS Sanjay Raut : राऊत जे बोलतात नेमकं त्याचं उलट होतं- संजय केळकर

Continues below advertisement
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना (UBT) आणि मनसे (MNS) एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे. 'दोन ठाकरे एकत्र येऊन सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवतील', असे खळबळजनक विधान राऊत यांनी केले. भाजपच्या (BJP) 'अब की बार सत्तर पार' या घोषणेला उत्तर देताना, 'दोन भावांचं अब की बार पंच्याहत्तर पार' असेल, असे म्हणत राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपला आव्हान दिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनी म्हटले आहे की, राऊत जे बोलतात त्याच्या नेहमी उलटंच होतं, पण आम्ही ठाकरे बंधूंना कमी लेखत नाही. जनतेचे आशीर्वाद आणि केलेल्या कामाच्या जोरावर आम्हीच जिंकू, असा विश्वासही केळकर यांनी व्यक्त केला आहे. या संभाव्य युतीमुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola