Healthcare War Room: 'आरोग्य सुविधांसाठी वॉर रूम उभारणार', मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा
Continues below advertisement
महाराष्ट्र सरकार लवकरच आरोग्य सुविधांसाठी एक विशेष 'वॉर रूम' उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी वॉर रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या वॉर रूममुळे केंद्र आणि राज्याच्या विविध आरोग्य योजनांमध्ये समन्वय साधला जाईल. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण आणि आदिवासी विकास अशा एकूण १२ विभागांच्या प्रमुखांची एक समिती यावर देखरेख ठेवणार आहे. माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांच्या नेतृत्वाखाली ही आरोग्य वॉर रूम काम करेल. या निर्णयामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा दुहेरी किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांना आळा बसेल आणि आरोग्य व्यवस्था अधिक सुव्यवस्थित होईल, असा विश्वास सरकारला वाटतो.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement