Sanjay Raut on Bogus Voters Row: 'महाराष्ट्रात एक कोटी मतदार बोगस', राऊतांचा आरोप

Continues below advertisement
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांवरून (Voter Lists) गंभीर आरोप केले आहेत. 'आजही महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये तब्बल एक कोटी मतदार बोगस आहेत', असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. यासोबतच, विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये (Mumbai) अवघ्या चार दिवसांत साडेसहा लाख मतदार वाढवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या कथित घोटाळ्याकडे देशाचं लक्ष वेधण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर (Election Commission) सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola