Maharashtra Superfast News : 20 OCT 2025 : 8 च्या अपडेट्स : ABP Majha

Continues below advertisement
राज्यातील मतदार यादीतील (Voter List) घोळावरून विरोधी पक्ष (Opposition) आक्रमक झाले असून, त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) मोर्चाची हाक दिली आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी टीका केली आहे. 'निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल', असा थेट इशारा विरोधकांनी दिला आहे. १ नोव्हेंबर रोजी मुंबईत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. याउलट, हा केवळ 'नरेटिव्ह सेट' करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दुसरीकडे, 'जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वराने लोकप्रिय केलं', असे म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यावर नाशिकच्या प्रभारी संघटकपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola