Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊत  

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान होत आहे. राज्यभरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लागल्या आहेत. विधानसभेच्या 288 मतदारसंघासाठी मतदान होत आहे. तर महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान सकाळी 11 पर्यंतची मतदानाची आकडेवारी हाती येत आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात 11 वाजेपर्यंत 21 विधानसभा मतदारसंघात 15.64 टक्के मतदान झालं आहे. सर्वात कमी मतदान हडपसर आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात 11.46 टक्के तर सर्वाधिक  मतदान 18.81 टक्के मतदान  बारामतीत विधानसभा मतदारसंघात होत आहे.   बारामती विधानसभा मतदारसंघाकडे देशाचं लक्ष संपूर्ण देशाचं लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीतही काट्याची लढाई झाली होती. त्यानंतर आता विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत आहे. अजित पवार यांच्याविरोधात सख्ख्या भावाचा मुलगा युगेंद्र पवार हा शरद पवारांच्या पक्षाकडून रिंगणात आहे. लोकसभा निवडणुकीलाही युगेंद्र पवार आणि श्रीनिवास पवारांनी सुप्रिया सुळे यांनाच पाठिंबा दिला होता.   श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया   आत्ता मतदानाची टक्केवारी कमी आहे. पण दुपारनंतर वाढेल. * लोकसभेला जेवढी मतं मिळाली त्यापेक्षा अधिकच यावेळी मिळेल, असा विश्वास अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram