Votting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

Continues below advertisement

Votting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत असून सकाळपासूनच मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नोकरीनिमित्त किंवा कामानिमित्त गावाबाहेर असलेले मतदार कालच गावात पोहोचले आहेत. तर, आज सकाळपासूनच पुणे (Pune), मुंबई येथून गावी जाणाऱ्या मतदारांच्या कारची मोठी रांग महामार्गावर दिसून येत आहे. मुंबईकडून (Mumbai) पुण्याच्या दिशेने आणि पुण्याहून सातारा, कोल्हापूर, सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे, मतदानासाठी जाणाऱ्या वाहनधारकांना व मतदारांना अधिकचा वेळ लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर पुण्यातील खेड-शिवापुर टोलनाक्यावरची वाहतूक टोलमुक्त करण्यात आली आहे. मतदारांना उशीर होऊ नये, त्यांचा मतदानाचा हक्क वंचित राहू नये, म्हणून प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  

साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांकडून टोल वसुल केला जात नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे, येथील वाहतूक टोल फ्री करण्यात आल्याची माहिती आहे. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची गर्दी जास्त असल्याने लोक मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रशासनाच्या सूचनेवरुन ही एकेरी वाहतूक टोल फ्री करण्यात आल्याची माहिती टोल कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मतदानासाठी मोठ्या प्रमाणात लोक मुंबई, पुणे शहरातून बाहेर पडले आहेत. तसेच, ट्रॅव्हल्ससह आपल्या चारचाकी वाहनांतून मतदार भरभरून जात आहेत, त्यामुळे येथील मार्गावरीलअनेक रस्ते जाम आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram