Special Report | साडेतीन एकरात तब्बल 40 टन डाळींब ; सोलापुरातल्या शेतकऱ्याला कष्टाचं 'फळ'
एक बाजूला झालेली अतिवृष्टी आणि यात बाग काशी वाचवायची या विवंचनेत सर्व शेतकरी असताना सांगोला तालुक्यातील अजनाळे गावाच्या नितीन मारुती येलपले या तरुण शेतकऱ्याच्या डाळिंबाला विक्रमी 151 रुपये एवढा दर मिळाला असून 40 टन डाळिंब मदुराई येथील व्यापाऱ्याने 60 लाख रुपयांचा खरेदी केले आहे . वास्तविक गणेश वाणाला सध्या 70 ते 80 रुपये एवढा दर मिळत असताना येलपले याना मिळालेला दर गेल्या अनेक वर्षातील विक्रम असल्याचे जाणकार सांगतात.