Sangli Vasagade : जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा रेल्वे रुळावर ठिय्या
abp majha web team
Updated at:
26 May 2023 01:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे-मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पात पलूस तालुक्यातील वसगडे मधील काही शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेने संपादित केल्या. मात्र मागील सहा महिन्यापासून या दिलेल्या जमिनीचा मोबदला बाधित शेतकऱ्यांना रेल्वेकडून भेटला नाही. वारंवार जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाशी संपर्क साधून देखील या शेतकरी मोबदला मिळाला नाही. त्यामुळे या बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत आज आपल्या शेतातील असलेल्या रेल्वे रुळावर जाऊन रेल्वे रोको आणि ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे