Sangli Flood : बाजारपेठ हलवण्याऐवजी पूरस्थिती थांबवा, सांगलीच्या व्यापाऱ्यांची मागणी
2019 चा पूर आणि त्यानंतर आलेला लॉकडाऊन यामुळे कोलमडलेल्या सांगलीच्या व्यापाऱ्यांची यंदाच्या पुरामुळे पूर्णच वाताहत झाली आहे. दक्षिण महाराष्ट्रातली एक महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या सांगलीच्या व्यापाऱ्यांचं पुरामुळे मोठं नुकासान झालंय. व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला तर बाजारपेठ इतरत्र हलवू असा पर्याय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवला मात्र बाजारपेठ हलवण्याऐवजी पूरच येणार नाही याची काळजी घ्या असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय.
Tags :
Maharashtra Latest Updates Latest Marathi News Abp Majha Maharashtra Monsoon Trending News Marathi News Marathi Live News ABP Maza Local News Top News ABP Majha Videos Top Marathi News Sangli Flood ABP Majha