Sangli Bandh | संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंद | ABP Majha
Continues below advertisement
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानने आज सांगली बंदची हाक दिली आहे. संजय राऊतांची हकालपट्टी करा, अशी मागणी संभाजी भिडेंनी केली आहे. योगायोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सांगली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे शिवप्रतिष्ठानने सांगली बंदची हाक मागे घ्यावी, अशी विनवणी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी 'लोकमत'च्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी पुरावे द्यावेत अशी मागणी केली. त्यानंतर आता संभाजी भिडे उदयनराजेंच्या समर्थनात पुढे आले आहेत.
Continues below advertisement