Sangli : सह्याद्री देवराईला परवानगी नाकारली, वृक्षप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींकडून पोलिसांचा निषेध

Continues below advertisement

महाराष्ट्रामध्ये झाडं लावण्यास भीक मागावी लागत असेल तर याहून दुसरी कोणती वाईट गोष्ट नाही असे म्हणत सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईला  झाडे लावण्यास परवानगी नाकारल्याने महाराष्ट्रमधील वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेत. तसेच जर या आडकाठीला कंटाळून सयाजी शिंदेनी पर्यावरण आणि वृक्ष लागवडीची चळवळ थांबवली तर ते महाराष्ट्रला।परवडेल का? असा सवालही या वृक्षप्रेमींनी उपस्थित केलाय.सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेला सातारमधील म्हसवे गावातील पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी तीन वर्षांपूर्वी मिळाली. मात्र  आता ही परवानगी का नाकारली असल्याची खंत सयाजी शिंदे यांनी एबीपी माझावर बोलून दाखविली होती. यानंतर सांगलीतील भोसे मधील 400 वर्षापूर्वीचे वडाचे झाड वाचणाऱ्या  वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमीनी सयाजी शिंदेंना पाठिंबा दर्शवत ज्या अधिकाऱ्यांनी झाडे लावण्यास आडकाठी घातलीय त्यांचा निषेध केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram