Sangli : मुलं चोरणारी टोळी समजून साधूंना मारहाण, पालघरची पुनरावृत्ती थोडक्यात टळली
पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या गडचिंचले गावाजवळ 16 एप्रिल 2020 रोजी साधूंची जमावाकडून हत्या करण्यात आली होती.. चोर आणि दरोडेखोरांच्या अफवेतून चोर समजून दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निघृणपणे झालेल्या हत्येच्या घटनेनं देश हादरला होता... यावरुन जोरदार राजकारणही झालं होतं. पालघरच्या याच घटनेची पुनरावृत्ती सांगलीत थोडक्यात टळलीय... मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आलीय.. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळलाय...