Sangli Rain : सांगलीकरांना दिलासा ; कृष्णा नदीची पाणीपातळी 23 फुटांवरुन 20 फुटांवर
कृष्णा नदीची काल पाणी पातळी काल 23 फुटांवर होती. जी आज कमी होऊन 20 फुटं.च्या आसपास गेली आहे. म्हणजे पाऊस कमी जास्त होईल तसा नदीच्या पाणी पातळीत चढ उतार होणार असून पुढील काही महिने अशीच परिस्थिती राहणार आहे. आता जरी पाण्याची पातळी कमी झाली असली तरी प्रशासन अलर्ट असून शिराळा, वाळवा, पलूस, मिरज या तालुक्यातील नदी काठची 104 गावे पुरबाधित जाहीर केली आहेत. दुसरीकडे आज महाराष्ट्रचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या मुख्यमंत्रीशी अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत आणि सांगली कोल्हापूरला पुराचा धोका यंदा निर्माण होऊ नये म्हणून बैठक घेत चर्चा करणार आहेत. दरम्यान यंदाचा जास्त पाऊसमान बघता महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने यंदा अधिक योग्य समन्वय ठेवला आणि धरणातील पाणी विसर्गाबतबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर सांगली , कोल्हापूरचा पूर टाळता येईल अशी अपेक्षा जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी व्यक्त केलीय.