Sangli Rain : निष्काळजीपणा नडला!सांगलीत भर पावसात पुल ओलांडणारा तरुण गेला वाहून
Sangli Rain : निष्काळजीपणा नडला!सांगलीत भर पावसात पुल ओलांडणारा तरुण गेला वाहून
सांगलीत उत्तरा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. तासगाव-खानापूर तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टी नोंदली गेली आहे.. जोरदार पावसाने छाटणी झालेल्या द्राक्ष पिकासह काढणीला आलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले असून रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्याने अग्रनी नदी वाहती झालेय. कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव गावाजवळच्या अग्रणी नदीच्या पुलावरून जाण्याचा प्रयत्न करणारा तरुण वाहत्या पाण्यात वाहून गेला. दुष्काळी भागात दमदार पाउस झाल्याने ओढ्यानाल्यांना पूर आला आहे. यामुळे अनेक पाणंद रस्ते व गावखेड्यात वस्तीवर जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. द्राक्ष बागामध्ये पाणी साचले असून फळछाटण्या झालेल्या बागांना या जोरदार पावसाचा फटका बसला आहे. खरीप हंगामातील उडीद, मूग, भुईमूग या काढणीला आलेल्या खरीप पिकांना या पावसाचा फटका बसला असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला हा पाउस उपयुक्त ठरणारा आहे.