Sangli crime | बाळाचा आजार बघवत नसल्याने सांगलीत 13 दिवसांच्या बाळाची आईकडूनच हत्या
सांगलीतील पलूस तालुक्यातील माळवाडी येथील पाटील मळा येथे अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या हत्याप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. बाळाची हत्या दुसरं तिसरं कोणी केली नसून त्याच्या आईनेच बाळाला बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाला असणारा आजार बघवत नसल्याने नैराश्यातून आईने बाळाला बुडवून मारल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालं.