US Presidential Election 2020 | जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर, विजयासाठी केवळ 6 इलेक्टोरल मतांची गरज
अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. जो बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले असल्याची माहिती आहे. त्यांनी कालच या संदर्भात आरोप केले होते. आज त्यांनी कोर्टात केस दाखल केली आहे.
Tags :
US Presidential Elections Donald Trump US Presidential Election 2020 US Election US Election 2020 India Joe Biden