सांगली : पैसे घेऊनही उपचार न केल्याचा नातेवाईकांचा आरोप, अॅपेक्स रुग्णालयात तब्बल 87 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
मिरज मधील Apex हॉस्पिटलमधील 87 रुग्णाच्या मृत्यूची बांतमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर या हॉस्पिटल मध्ये ज्यांनी आपले आई, वडील, नातेवाइक ऍडमिट केले होते त्यांनी आता समोर येत या हॉस्पिटलच्या कारभाराचा पाढा वाचला आहे. यातील काही जणांचे वडील या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. पण काही दिवसात या रुग्णाचा मृत्यू झाला. यातील बहुतांश रुग्णाचे बिल हे 3 लाखाच्या आसपास झाले होते. यामुळे केवळ लाखो रुपये घेऊन उपचार न केल्यामुळे आमच्या वडिलांचा मृत्यू झाल्यचा आरोप मयत रुग्णाच्या मुलांनी केलाय.
Continues below advertisement