Sangli : हिमाद्रीच्या रक्षणासाठी सह्याद्री धारातीर्थी, जवान रोमित चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार

Continues below advertisement

जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमकीत शहीद झालेले जवान रोमित चव्हाण यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव इथं रोमित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. रोमित यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी, आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील हजारोंचा जनसागर लोटला होता. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. रोमित चव्हाण अमर रहे, भारत माता की जयच्या घोषणा देत रोमित यांना अखेरचा निरोप देण्यात आला.  दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात रोमित चव्हाणसह उत्तरप्रदेशच्या संतोष यादव यांनाही हौतात्म्य प्राप्त झालं... रोमित यांचं फक्त 23 वर्षे इतकं होतं. मात्र या कोवळ्या वयात त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान केलंय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram