Sangli : 10 मिनिटात 5 हजार दिवे लावून सांगलीचा कृष्णाकाठावरील माई घाट उजळला

सांगलीत कृष्णा नदीच्या काठावरील माई घाटावर केवळ दहा मिनिटात पाच हजार दिवे लावून माई घाट दिव्यांनी उजळविन्यात आला. नयनरम्य अशा या दिव्यांमधून नदी काठावरील माई घाटावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे शब्द साकारले गेले. नदी काठावरचे हे नयनरम्य दृश्य डोळे दिपून टाकणारे होते. निमित्त होते सांगलीच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित कृष्णा नदी महोत्सवाचे. कृष्णा काठी माईघाटावर सुर्यास्तानंतर नयनरम्य अश्या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी 5 हजार दिव्यांची मनमोहक अशी आरास करण्यात आली. भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव अशी अक्षरे व माई घाटाचा परिसर दिव्यांनी उजळून निघाला. कृष्णा नदी महोत्सवा अंतर्गत नदी काठावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दहा मिनिटात पाच हजार दिवे लावून माई घाट दिव्यांनी उजळविन्याच्या कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता झाली.  कृष्णा नदीच्या काठावरील माई घाटावर जलसंपदा विभागाने केवळ दहा मिनिटात पाच हजार दिवे लावून माई घाट दिव्यांनी उजळविला. नयनरम्य अशा या दिव्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे शब्द साकारले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola