Child Vaccine : मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई पालिका सज्ज, पालिकेची Blue Print ABP माझाच्या हाती

मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई पालिका सज्ज झालीय. केंद्राकडून मंजुरी मिळताच आठवडाभरात लसीकरण सुरु करण्याचं नियोजन मुंबई महापालिकेनं आखलंय. पहिल्या दिवशी, 28 व्या दिवशी आणि 56 व्या दिवशी अशा प्रकारे लहान मुलांना तीन डोस देण्यात येणार आहेत. 2 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणासाठी 250 केंद्रांवर व्यवस्था करण्यात येणार आहे. डोसची उपलब्धता आणि मुलांकडून मिळणारा प्रतिसाद यानुसार केंद्रांची आणि लसीकरणाची संख्या वाढवली जाणार आहे. 18 वर्षांखालील 35 लाख मुलांचे लसीकरण करण्याचं आव्हान मुंबई महापालिकेसमोर असणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola