Sangli Kidnapping Attempt | सांगलीत तीन अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचा डाव फसला

Continues below advertisement
सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न सांगलीतील विश्रामबाग पोलिस आणि सातारा रेल्वे पोलिसानी हाणून पाडलाय. रात्री 11 च्या सुमारास मिरजेतून महालक्ष्मी एक्सप्रेसमधून तीन मुलांना घेऊन एकजण मुंबईकडे प्रवास करत होता. यावेळी सातारा मध्ये मुलाना घेऊन जाणाऱ्या संशयितास रेल्वे पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतलं. अपहरण करण्यात आलेली मुले ही सांगलीच्या हनुमान नगर परिसरातील होती, कालपासून ही मुले गायब होती, सध्या ही तीनही मुले सुखरुप आहेत. मुलाना फूस लावून त्याचे अपहरण करून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडे विश्रामबाग पोलीस अधिक चौकशी करत असून यातून मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram