Sangli Flood : कृष्णाकाठच्या नागरिकांनी परतण्याची घाई करु नये : सांगली पालिका आयुक्त

Continues below advertisement

 सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी ४० फुटांखाली आल्यानंतर कृष्णाकाठच्या गावात नागरिक परतण्यास सुरुवात झालेय मात्र अजूनही नागरिकांनी आपल्या घरी परतू नये असं आवाहन सांगली पालिकेच्या आयुक्तांनी केलंय. हवामान खात्यानं या आठवड्यात कोयना धरण क्षेत्र आणि परिसरात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या आठवड्यात पाण्याची पातळी पुन्हा 40 फुटांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुले नागरिकांनी घरी परतण्याची घाई करू नये तसंच या परिसरातील व्यावसायिकांनीही माल, मौल्यवान वस्तू आपल्या आस्थापनांमध्ये आणण्याची घाई करू नये असं आवाहन आयुक्तांनी केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram