पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता,आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा
मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का याचा आज झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक झाली असून राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
राज्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये काही शिथिलता आणली पाहिजे यासाठी आम्ही अहवाल सादर केला आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, राज्याचे अर्थचक्र चाललं पाहिजे यासाठी शिथिलता गरजेची आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील पण एसीचा वापर नसावा. दुसरीकडे रेस्टॉरंट, सलून पार्लर हळूहळू जास्त संख्येने सुरु करता येतील. शनिवार आणि रविवार पैकी आता शनिवारी संध्याकाळी सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकेल.
Tags :
Covid 19 Coronavirus Corona Health Minister Rajesh Tope Coronavirus Mucormycosis Positivity Rate