Sangli Double Death: वाढदिवशीच Dalit Mahasangh जिल्हाध्यक्ष Uttam Mohite यांची हत्या

Continues below advertisement
सांगली शहरात मंगळवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर, हल्लेखोर शाहरुख शेख याला संतप्त जमावाने मारहाण केली, ज्यात त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, 'ही हत्या जुन्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे'. उत्तम मोहिते (वय ४१) हे गारपीर चौकातील रहिवासी होते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळीच त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेमुळे सांगली शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola