Sangli Carrot Farming : गाजर शेतीमुळे कवलापूर गावात समृद्धी ABP Majha

Continues below advertisement

 मकर संक्रांतीचा सण जवळ आलाय. या काळात गाजराला मोठी मागणी असते. याच गाजराचं विक्रमी उत्पादन सध्या सांगलीमधील कवलापूर या गावात केलं जातंय. हे गाव पूर्वी द्राक्ष उत्पादक होतं. मात्र गेल्या काही काळापासून गावात गाजराचं पीक मोठ्या प्रमामात घेतलं जातं. सेंद्रीय आणि देशी पद्धतीनं गाजराची शेती केली जाते. गावच्या पाण्यामुळ इथल्या गाजराची चवही वेगळीच आहे. त्यामुळे कवलापूरच्या गाजराला फक्त महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटकच्या बाजारातही मोठी मागणी आहे. गावतच गाजराचं पीकही घेतलं जातं आणि त्यावर प्रक्रियाही होते. आणि गावचेच तरूण हे पीक बाजारापर्यंत पोहोचवतात.. त्यामुळे गाजर इथल्या समृद्धीचं कारण बनलंय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram