Sangli Bandh | उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती, संजय राऊतांना पदावरुन दूर करा : संभाजी भिडे | ABP Majha
संजय राऊत यांना पदावरून दूर करण्याची मागणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती करतो, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी सांगलीत दिली. सांगलीत आयोजित करण्यात आलेला बंद हा शिवसेनेविरोधात नसल्याचंही भिडे यांनी स्पष्ट केलं आहे. उदयनराजे भोसलेंबद्दल संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठाननं आज सांगली बंदची हाक दिली आहे. योगायोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सांगली दौऱ्यावर आहेत.