Sangli Bailgada Sharyat : सांगलीत पहिली अधिकृत बैलगाडा शर्यत, गुढ्या उभारुन बैलजोड्यांचं स्वागत

Continues below advertisement

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यानंतर राज्यातली पहिली अधिकृत शर्यत सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात पार पडतायत. नांगोळे गावातल्या ग्रामस्थांनी  सूर्योदयापूर्वी दारात गुढ्या उभारुन शर्यतीसाठी येणाऱ्या बैलजोड्यांचे स्वागत केलंय. यावेळी सर्व बैलगाड्यांची पूजाही करण्यात आली. सांगलीच्या जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेऊन आणि कोरोना नियम पाळून होणाऱ्या या शर्यतीमुळे नांगोळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नांगोळे गावच्या ज्या माळरानावर ही बैलगाडा शर्यत पार पडणार आहे त्या मैदानातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram