MPSC Exam : एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा 23 जानेवारीला होणार,तीन परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर

एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा २३ जानेवारीला होणार आहेत. तीन परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. एमपीएससीच्या परीक्षांमुळे म्हाडाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्यात. म्हाडा सरळ सेवा भरती परीक्षा २९ आणि ३० जानेवारीला होणार होत्या. मात्र आता म्हाडाच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. अनेक उमेदवारांना एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने अडथळा निर्माण झाला होता. याबाबत माझानं बातमी दाखवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola