Sangli : कृष्णाकाठावर परदेशी पाहुण्यांचं आगमन, परदेशी पक्षी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी : ABP Majha
Continues below advertisement
नोव्हेंबर महिना जवळ येताच स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची उत्सुकता महाराष्ट्रातील पक्षीप्रेमींना लागलेली असते. यंदा पावसाळा दीर्घकाळ राहिल्याने हिवाळ्यात सांगलीच्या कृष्णाकाठावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमनाबाबत उत्सुकता होती. तर ही प्रतिक्षा संपली असून सामान्य तुतवार, ठिपकेदार तुतवार, छोटा कंठेरी चिखल्या, पांढरा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी, पिवळा धोबी अशा पाणथळीच्या पक्षांचे हजारो मैलाचा प्रवास करून कृष्णाकाठावर आगमन झाले आहे.
Continues below advertisement