Sangamner Sewer Accident | संगमनेर भूमिगत गटार दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू

अहिल्यानगरच्या संगमनेर शहरात भूमिगत गटार कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटाराचे काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. विषारी वायूमुळे गुदमरून अतुल रतन पवार आणि रियाज पिंजारी या दोन कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एका कामगाराची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. नगरपालिका ठेकेदाराकडे काम करणाऱ्या या कामगारांच्या मृत्यूमुळे संगमनेर शहरात तीव्र शोककळा पसरली आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे भूमिगत गटार कामांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola