Public Security Bill : विधानसभेत मंजूर झालेलं जनसुरक्षा बिल आज विधानपरिषदेत, राज्याचं लक्ष
आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा संपत आहे. काल विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले. हे विधेयक आज विधान परिषदेत मांडले जाईल. विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ विधानसभेच्या तुलनेत जास्त असल्याने या विधेयकावरून परिषदेत गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. जनसुरक्षा विधेयक लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पाचवे राज्य आहे. या विधेयकाचा मुख्य उद्देश शहरी नक्षलवादाला आळा घालणे हा आहे. सरकारचा मानस आहे की या कायद्यामुळे शहरी नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण येईल. या विधेयकावर विधानसभेत चर्चा झाली असून आता विधान परिषदेत यावर चर्चा अपेक्षित आहे. विरोधकांनी या विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप घेतला आहे.