Indurikar Maharaj | इंदोरीकरांवर PCPNDT अॅक्टनुसार गुन्हा दाखल : सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अखेर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर कोर्टात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात मुला-मुलीच्या जन्माविषयी केलेल वक्तव्य त्यांना भोवलं असून सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल केला होता. PCPNDT अक्टनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.