Tourism In Konkan | गोव्याच्या धर्तीवर आता कोकणातही बीच शॅक्स!
Continues below advertisement
अगदी परदेशात किंवा गोव्यातील समुद्रकिनारी दिसणारे बीच शॅक्स तुम्हाला यापुढे कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही पाहायला मिळणार आहे. विश्वास बसत नाही? पण, हो हे खरं आहे. राज्य मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या 1 सप्टेंबरपासून पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील आठ ठिकाणी सागरी किनाऱ्यांवर हे बीच शॅक्स उभारले जाणार आहेत.
Continues below advertisement