Sangali: उसाचं एकरी 158टन विक्रमी उत्पादन, 8 एकरावर उसाची लागवड ABP Majha

Continues below advertisement

एकात्मिक खत व्यवस्थापना अंतर्गत रासायनिक, सेंद्रिय आणि जीवाणू खतांचा वापर करुन विट्यातील दोन शेतकऱ्यांनी ऊसाचं एकरी तब्बल १५८ टन इतकं विक्रमी उत्पादन घेतलंय... सांगलीच्या विटा येथील शेतकरी केदार सूर्यवंशी आणि विठ्ठल साळुंखे यांनी ही किमया घडवून आणली आहे..  या शेतकऱ्यांनी एकूण आठ एकरावर ऊसाची लागवड केली  त्यात त्यांना एकरी तब्बल १५८ टन इतके विक्रमी उत्पादन मिळालय. तसेच आठही एकरावर ऊसाचा दर्जाही एकसारखा राहिलाय.. त्यामुळेे केवळ रासायनिक खतांचा वापर करुन भरघोस उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांचा हा प्रयोग मार्गदर्शन देणारा ठरणार आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram