Sangali: द्राक्ष बागांवर 'आभाळ कोसळलं', ६५ हजार एकरांवरील बागांना फटका ABP Majha
Continues below advertisement
सांगलीत ६५ हजार एकरांवरील द्राक्ष बागांवर आभाळ कोसळलंय. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा रोगांच्या विळख्यात सापडल्यात. द्राक्षांना घडकूज, मणिगळ, दावण्याचा रोगांचा प्रादुर्भाव झालाय. ७० टक्के द्राक्षांचे मोठं नुकसान झालंय. उरल्या सुरल्या बागा वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादकांकडून महागड्या औषधांची फवारणी सुरु आहे. आणखी चार दिवस ढगाळ हवामान राहणार असल्याने बागायतदारांचा जीव टांगणीला लागलाय.
Continues below advertisement