Sangali: अत्यवस्थ रुग्णांसाठी इलेक्ट्रिक रुग्णवाहिका ABP Majha
सांगली जिल्ह्यातल्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयात अत्यवस्थ रुग्णांसाठी खास इलेक्ट्रिक कॅम्पस ॲम्बुलन्सची सोय करण्यात आलीय. रुग्णालयात दाखल झालेल्या अत्यवस्थ रुग्णांना विविध चाचण्या, सिटीस्कॅन, शस्त्रक्रिया, एक्सरेसाठी दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागतं.. या वेळी कुशल मनुष्यबळाची गरज तर भासतेच.. सोबत वेळही लागतो.. ही कामं जलद व्हावीत यासाठी आता दोन मोटारीची व्यवस्था करण्यात आलीय.. या मोटारी विजेवर चालवल्या जाणार आहेत.. तसंच या मोटारीमध्ये अत्यवस्थ रुग्णांसाठी कृत्रिम प्राणवायू देण्याची व्यवस्थाही करण्यात आलीय.. सांगली जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून यासाठी १५ लाख रुपये खर्च करण्यात आलाय..