Sandipan Bhumre Audio Clip Viral : संदीपान भुमरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल, विरोधक काय म्हणतात...
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होतीय. यामध्ये संदीपान भुमरे हे एका व्यक्तीला शिवीगाळ करत असल्याचं ऐकायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, दरकवडी गावातील भाऊसाहेब वाघ यांनी गावातील रस्त्याबाबत भुमरेंच्या पीएकडे तक्रार केली. त्यावरून, रस्त्याची तक्रार करताना आपल्या मुलाचं नाव का घेतलं? असा सवाल करत भुमरेंनी भाऊसाहेब वाघ यांना शिवीगाळ केल्याचं बोललं जातंय. आता या प्रकरणी संदीपान भुमरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. दरम्यान, या ऑडिओ क्लिपच्या सत्यासत्यतेबद्दल एबीपी माझा पुष्टी करत नाही.
Continues below advertisement